सध्या देशात इंधन दरवाढ वेगाने होत आहे. मागच्या 10 दिवसांत सलग नऊ दिवस इंधन दरवाढ झाली आहे. गुरुवारीही पेट्रोल – डिझेलमध्ये प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. गुरुवारी झालेल्या दरवाढीमुळे आता मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे.
पुन्हा इंधनात दरवाढ
गेल्या 10 दिवसांत देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल 6.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 6 रुपये 40 पैशांपर्यंत महागलं आहे. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी 101.81 रुपये आणि डिझेलसाठी 93.07 रुपये खर्च करावे लागत आहेत. यापूर्वी 21 मार्च रोजी राजधानीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 आणि डिझेलचे दर 86.67 रुपयांवर होते.
( हेही वाचा: बापरे! आता लस घ्यायला जावं लागणार दिल्लीला )
महानगरांतील इंधनाचे दर
22 मार्च 2022 पासून पेट्रोल -डिझेलच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या देशातील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रति लिटर किती पैसे मोजावे लागत आहेत ते पाहूया. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर 116.72 तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 101.81 तर डिझेल 93.07 प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 107.45 तर डिझेल 97.52 प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोल 111.35 तर डिझेल 96.22 प्रति लिटर आहे.