केंद्र सरकारकडून शनिवारी पेट्रोल-डिझेलच्या अबकारी करांत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय रविवारपासूनच लागू करण्यात आला असून, आता राज्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबईत इंधनाच्या दरांत मोठी घट
पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात(Excise duty)प्रतिलिटर 8 रुपयांची, तर डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 6 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेट्रोल प्रतिलिटर 9.5 रुपयांनी तर डिझेल पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 120 रुपयांवरुन 111.35 रुपये झाली आहे. तर डिझेल प्रतिलिटर 104 रुपयांवरुन 97 रुपयांपर्यंत आले आहे.
(हेही वाचाः सरकारी कर्मचा-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय)
पुणे नागपुरात कसे आहेत दर?
पुण्यात पेट्रोलची किंत 119.97 रुपयांवरुन 110.88 रुपये रुपये इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या किंमती प्रतिलिटर 102.68 रुपयांवरुन 95.37 रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. नागपूरात पेट्रोल प्रतिलिटर 105.71 रुपयांवरुन 97.04 रुपये इतके झाले आहे. तर डिझेलच्या दरांत प्रतिलिटर मागे 96.95 रुपयांवरुन 89.89 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये झाली असून, डिझेलची किंमत 89.62 रुपये इतकी झाली आहे.
(हेही वाचाः पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फुटली, उड्डाणपुलाचे काम पूर्ण)
Join Our WhatsApp Community