पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल

151

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे ( petrol-diesel ) दर गगनाला भिडले आहेत. अशातच युरोपीय युनियनने रशियाकडून पुरवल्या कच्च्या तेलाच्या ( Crude Oil Price) आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराराणींच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय? )

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

मार्च २०२२ नंतर पहिल्यांदाच ब्रेंट कच्च्या तेलाची (Brent Crude Oil) किंमत प्रति बॅरल ११५ डॉलरच्या पुढे गेली आहे. ही मार्चनंतरची सर्वोच्च वाढ आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, रशियातून येणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली यामुळे दरात वाढ झाली आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किमती वधारल्यामुळे आता भारतात सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

२२ मार्च ते ६ एप्रिल २०२२ पर्यंत पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी महागले होते. आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तर महागाई सुद्धा आणखी वाढू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.