वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राने त्यावरील अबकारी कर कमी केला. त्यामुळे पेट्रोल ५ रुपयाने तर डिझेल १० रुपयाने कमी झाले. मात्र यामुळे पेट्रोल पंप मालक नाराज झाले आहेत. त्यांनी या दर कपातील विरोध दर्शवला आहे. केंद्रानंतर जर राज्य सरकारही कर कपात करणार असेल, तर त्याची कल्पना पेट्रोल पंप मालकांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दिवाळीत महागड्या किमतीत इंधन खरेदी केलेली
राज्यातील पेट्रोल पंप मालकांनी केंद्राने आम्हाला पूर्व कल्पना न देता कर कपात केल्यामुळे आमचे तडकाफडकी २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारही कर कपात करणार असेल तर कृपया त्यांनी आगाऊ कल्पना आम्हाला द्यावी, अशी मागणी पंप मालकांनी केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीचा निर्णय घेतला. त्याआधी पंप धारकांनी दिवाळी असल्यामुळे महागड्या किमतीत मोठ्या संख्येने इंधन खरेदी केली होती, असे कारण पंप धारकांनी दिले.
(हेही वाचा : विधान परिषदेसाठी सेना – युवा सेनेत रस्सीखेच)
काय म्हणाले पंप धारक?
केंद्राच्या निर्णयामुळे राज्यातील ६ हजार ५०० पंप मालकांना सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्ही हा परतावा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. जर आम्हाला आगाऊ माहिती मिळाली असती तर आम्ही इंधन अधिक प्रमाणात खरेदी केली नसती, असे सांगत आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिले आहे की, राज्य सरकार जर इंधन दर कपात करण्याच्या विचारात असेल तर त्यांनी आम्हा आगाऊ कळवावे, असे महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे उदय लोढ म्हणाले.
Join Our WhatsApp Community