MSRTC ने ऑक्टोबरपासून ३००० कामगारांच्या पीएफची रक्कम भरली नाही

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने एसटीचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेतली.

87

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) कामगारांच्या देणी थकवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्या थकलेल्या आहेत. म्हणून महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने एसटीचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांची मंत्रालयातील त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

याविषयी माहिती देताना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली १२०० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ. ट्रस्टमध्ये भरली नसून ट्रस्टकडे गुंतवणुकी व्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नसल्याने राज्यभरातील ३००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून पी एफ अँडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांचे आजारपण, मला मुलींची लग्ने, शाळा-कॉलेजचा खर्च यासाठी आपल्याच हक्काच्या जमा रक्कमेतून पैसे मिळत नाहीत. याच बरोबर बहुतांशी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिलांच्या खर्चाची प्रतिपूर्ती साधारण १५० कोटी रुपये इतकी रक्कम सुद्धा वर्षभरापासून मिळालेली नसून कुटुंबीयांचा आणि स्वतःचा वैद्यकीय खर्च कसा करायचा या चिंतेत कर्मचारी सापडले आहेत. या शिवाय जानेवारी २०२४ पासून वाढलेला चार टक्के महागाई भत्ता सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळाला नसून या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अर्थ खात्याकडून एसटीला (MSRTC) निधी उपलब्ध करून देण्यासाठी थकीत रक्कमांचा आढावा घेऊन अर्थ खात्याकडून एसटीला निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अशी विनंतीही नवीन अध्यक्षांना केली असल्याचे बरगे यांनी या वेळी सांगितले.

(हेही वाचा MSRTC Bus Financial Report : भाडेवाढीनंतरही एसटीची आर्थिक स्थिती जेमतेमच; २००-३५०० कोटी रुपयांची देणी थकित)

या शिवाय संजय सेठी हे राज्य परिवहन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने हल्लीच जी एकच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्या पैशावरुन वाहक आणि प्रवाशी यांच्यात दररोज खटके उडत असून त्याचा उत्पन्नावर सुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे या निर्णयात बदल करून भाडेवाढ पाचच्या पटीत भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती सुद्धा त्यांना करण्यात आली. यावेळी संतोष गायकवाड, सुमन ढेंबरे, संतोष माळी, कमलाकर जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. (MSRTC)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.