कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO अंतर्गत नोंदणी असलेल्या पीएफ खातेधारकांना 7 लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळू शकतो. एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्यूरन्स स्कीम(EDLI)अंतर्गत ईपीएफओच्या पीएफ धारकांना विमा संरक्षण देण्यात येते. पीएफ धारकाच्या नॉमिनीला या विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
कशी आहे EDLI योजना?
ज्या पीएफ धारकाने आपल्या मृत्यूच्या आधी किमान 12 महिने एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये काम केले आहे, अशा कर्मचा-याचा आजारामुळे, अपघातामुळे किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास कर्मचा-याने नामनिर्देशित केलेल्या नॉमिनीला EDLI योजनेवर दावा करता येतो. आता या कवचांतर्गत त्या कर्मचा-याच्या कुटुंबीयांना देखील याचा लाभ घेता येणार आहे. EDLI मध्ये पीएफ धारकांना कोणतीही रक्कम भरावी लागत नाही.
(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना सरकारने दिली आनंदाची बातमी, खात्यात व्याज जमा व्हायला सुरुवात! असा चेक करा बॅलेन्स)
असा मिळवा लाभ
EDLI योजनेंतर्गत विम्याचा लाभ घेण्यासाठी विमा संरक्षणाचा फॉर्म 5 आयएफ देखील नियोक्त्याकडे सबमिट करावा लागेल. त्यानंतर नियोक्त्याकडून या फॉर्मची पडताळणी करण्यात येईल. नियोक्ता नसल्यास राजपत्रित अधिकारी,दंडाधिकारी,ग्रामपंचायत अध्यक्ष,नगरपालिका अध्यक्ष,सचिव किंवा सदस्य किंवा जिल्हा स्थानिक मंडळ,पोस्टमास्टर यांच्याकडूनही हा फॉर्म प्रमाणित केला जाऊ शकतो.
(हेही वाचाः EPFO: PF धारकांना मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला)
Join Our WhatsApp Community