EPFO: PF खातेधारकांनो, चुकूनही करू नका ‘या’ चूका, नाहीतर होईल मोठे नुकसान

199

पगारदार लोकांसाठी, भविष्य निर्वाह निधीचे पैसे ही त्यांची आयुष्यभराची कमाई असते. निवृत्त झाल्यानंतर प्रत्येक पगारदार व्यक्तीला या पीएफच्या जमापुंजीची आशा असते. त्यामुळे पीएफशी संबंधित नियमांची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा माहितीच्या अभावामुळे किंवा काही चुकांमुळे पीएफ खाते बंद होते. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येकाने सावध असणे गरजेचे असते.

खाते होऊ शकते इनऑपरेटिव्ह

जेव्हा एखाद्या कंपनीत काम करत असताना आपण ती कंपनी बदलून दुस-या कंपनीत काम करायला सुरुवात करतो, तेव्हा आपले आधीच्या कंपनीतील पीएफ खाते नव्या कंपनीकडे हस्तांतरित करणे महत्वाचे असते. कारण जर समजा तुमची जुनी कंपनी बंद झाली आणि तुमच्या पीएफ खात्यातून 36 महिन्यांपर्यंत कुठलाही व्यवहार झाला नाही, तर आपले पीएफ खाते बंद हाऊ शकते. EPFO कडून अशा खात्यांना इनऑपरेटिव्ह म्हटले जाते.

(हेही वाचा: कशी ओळखाल खोटी नोट? RBI ने दिलेल्या ‘या’ मार्किंग्स बघा)

यामुळे होते अकाऊंट बंद

  • सेवानिवृत्तीच्या 3 वर्षांनंतर जेव्हा कर्मचारी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढत नाही तेव्हा
  • जेव्हा कर्मचारी परदेशात स्थायिक होतो तेव्हा
    जेव्हा कर्मचा-याचा मृत्यू होतो तेव्हा
  • जेव्हा कर्मचारी आपले सर्व सेवानिवृत्ती फंड काढून घेतो तेव्हा
  • जर सात वर्षांपर्यंत पीएफ खात्यावर कोणताही दावा करण्यात आला नाही, तर हा निधी ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये वर्ग करण्यात येतो.

खाते इनऑपरेटिव्ह झाल्यावर काय कराल?

खाते इनऑपरेटिव्ह झाल्यानंतर त्या खात्यात आपल्याला व्यवहार करता येणार नाही. हे खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला EPFO कडे अर्ज करणे गरजेचे आहे. दरम्यान तुमचे खाते बंद असले तरी त्यातील पैशांवर तुम्हाला व्याज मिळत राहते. त्यामुळे खाते बंद झाले तरी ते सुरू झाल्यानंतर तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. 2016 मध्ये नियमात करण्यात आलेल्या बदलानुसार पीएफ खात्यातील पैशांवर व्याज मिळते. वयाची 58 वर्षे पूर्ण होईपर्यंत हे व्याज आपल्याला मिळत राहते.

(हेही वाचा: 500 च्या ‘या’ नोटा आहेत खोट्या? केंद्र सरकारचा मोठा खुलासा)

अशी मिळवता येते रक्कम

ही रक्कम काढण्यासाठी केवायसी कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय आयडी कार्ड, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश आहे. याशिवाय आधार कार्डासारखे सरकारकडून जारी केलेले इतर कोणतेही ओळखपत्र यासाठी वापरले जाऊ शकते. यानंतर, सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी रकमेनुसार खात्यातून पैसे काढणे किंवा खाते हस्तांतरणास मान्यता देऊ शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.