PF Withdrawal : देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) ग्राहकांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे अतिशय सोपे होणार आहे. या आधी पीएफमधून पैसे काढण्यासाठी एका दीर्घ प्रक्रियेतून जावे लागत होते, परंतु आता गुगल पे, फोन पे अशा यूपीआय प्लॅटफॉर्मसोबतच ATM वरून देखील पीएफची रक्कम काढता येणार आहे. (PF Withdrawal)
केंद्र सरकार लवकरच UPI द्वारे पीएफ फंड ट्रान्सफरची सुविधा सुरू करणार आहे. यामुळे पीएफ काढणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि जलद होणार आहे. या नवीन सुविधेअंतर्गत, ईपीएफओचे सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातून थेट गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्ससोबतच एटीएमवरुन देखील पैसे काढू शकतात.
एटीएममधून पीएफ काढण्याची सुविधा
सरकार केवळ UPI द्वारे पैसे काढण्याचीच नाही तर EPFO 3.0 प्रणाली अंतर्गत ATM द्वारे PF खात्यातून पैसे काढण्याची सुविधा देखील आणण्याची तयारी करत आहे. ही सुविधा मे-जून 2025 पर्यंत सुरू केली जाऊ शकते. यामुळे ग्राहकांना डेबिट कार्डची सुविधा मिळेल. याद्वारे सदस्य कोणत्याही एटीएममधून त्यांचे पीएफचे पैसे काढू शकतील. तसेच ईपीएफओ येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून फंड काढण्यासंदर्भातील सुविधा देणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयानं एनपीसीआयच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. त्यामुळं यूपीआयच्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची किंवा काढण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
(हेही वाचा – कुणाल कामराच्या वादग्रस्त टिप्पणीवर Yogi Adityanath यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘काही लोकांनी देशाचा…’)
सुमित डावरा (Sumit Davra) यांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएफओ सदस्य तातडीनं 1 लाख रुपयांपर्यंतच रक्कम काढून त्यांच्या बँक खात्यात वर्ग करु शकतात. याशिवाय यूपीआयद्वारे पीएफ खात्यातील शिल्लक तपासली जाऊ शकेल. ईपीएफओनं 120 हून अधिक डेटाबेसला इंटिग्रेट करुन प्रक्रिया डिजीटल करण्यात प्रगती केलीय. क्लेम प्रोसेसिंगचा वेळ कमी करुन 3 दिवसांवर आणला. पीएफ काढण्यसाठी 95 टक्के क्लेम ऑटोमेडेड आणि सोपी करण्यावर काम सुरु आहे. यामुळे डिसेंबर 2024 नंतर पीएफ खातेदारांना कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल.
हेही पहा –