केरळला सीरिया बनवण्याचा कट! शाळकरी मुलांचा वापर

मुस्लीम कट्टरपंथी लव्ह जिहाद, लव्ह नार्कोटिक्स आणि धर्मांतर यांसारखे डावपेच अवलंबून देशात द्वेष पसरवण्याचा कट रचत असताना, आता लहान मुलांमध्ये धर्माचे विष पसरवले जातं आहे. अशीच एक घटना केरळमध्ये समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. राज्यातील पठाणमथिट्टा जिल्ह्यात बाबरी मशिदीच्या जयंतीदिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी शाळेत जाणाऱ्या मुलांना ‘मी बाबरी’ बॅचचे वाटप करण्यात आले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियातर्फे या बॅचचे वितरण करण्यात आले. या कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी पीएफआयला फटकारले आहे. केरळ सीरिया होत आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी पीएफआय कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पीके कृष्णदास यांनी पठाणमथिथा जिल्ह्यातील कट्टंगल येथील सेंट जॉर्ज शाळेतील घटनेबाबत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडे (NCPCR) तक्रार दाखल केली आहे. कट्टागल पंचायतीवर CPI-M ची सत्ता आहे, ज्याला PFI ची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे.

पोलिसात गुन्हा दाखल

भाजप नेते सुरेश के पिल्लई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात एसडीपीआयचा कार्यकर्ता मुनीर नजर याचे नाव पुढे आले आहे. तपासादरम्यान त्याला अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भाजपचा आरोप

भाजप नेते कृष्णदास यांनी सांगितले की, शाळेतील बहुतांश विद्यार्थी हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील आहेत. मुलांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी बॅचचे वाटप करण्यात आले आहे. आयोगाने याप्रकरणी कारवाई करावी. यासोबतच केंद्रीय गृहमंत्रालयाकडेही तक्रार करण्यात आली आहे.

केरळ सीरिया होत आहे का?

या कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी पीएफआयला फटकारले आहे. केरळ सरकार दोषींवर कारवाई करणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. केरळ सीरिया होत आहे का?, असा सवालही त्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर अतिरेक्यांचे समर्थन केल्याचा आरोप केला आहे.

 ( हेही वाचा:  देशातील ‘हे’ पहिलं राज्य, जिथं सर्व नागरिक झाले ‘लसवंत’! )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here