कोरोना काळात फायझर लस आयत करण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणला जात होता. मात्र भारताने स्वतःची लस बनवली. आता त्याच फायझर लसीचे अमेरिकेत किती विपरीत परिणाम झाला, याची धक्कादायक माहिती प्रसिद्धी झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या फायझर दस्तऐवजानुसार, फायझरच्या mRNA कोविड लसीच्या चाचणीत सहभागी झालेल्या 40 टक्क्यांहून अधिक गर्भवती महिलांचा गर्भपात झाल्याचे उघड झाले आहे.
Pfizer documents ordered by a US judge to be released showed that 44% of pregnant women in the COVID-19 vaccine trial lost their babies.
This is the drug many of Liberals in India & the Lutyens Media wanted PM Modi to import.
Thank God India went for Covidshield and Covaxin pic.twitter.com/dltfvxlgDn— J Nandakumar (@kumarnandaj) August 17, 2022
लेखी अहवालात माहिती समोर
कागदपत्रांच्या आधारे वरील धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५० गर्भवती महिलांपैकी २२ महिलांनी त्यांची मुले गमावली. स्त्रीवादी लेखिका आणि पत्रकार डॉ. नाओमी वुल्फ यांनी स्टीव्ह बॅननच्या वॉर रूम पॉडकास्टवर ही माहिती उघड केली. वुल्फ म्हणल्या की, गर्भपात दर्शविणारा प्रतिकूल अहवाल १३ मार्च २०२१ रोजी आला होता. तो अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) १ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झाला. सत्य माहित असूनही गप्प राहिल्याबद्दल वुल्फ यांनी एफडीएवर निशाणा साधला आहे. तसेच एफडीएला एप्रिल 2021 च्या सुरुवातीपर्यंत भ्रूण मृत्यूच्या वाढलेल्या दराची जाणीव होती, तरी ते शांत होते, असे वुल्फ यांनी म्हटले. वुल्फ यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की, फायझर चाचणीचा बाहेर आलेला डेटा जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गर्भपाताच्या वाढीशी संबंधित आहे. धक्कादायक म्हणजे, सीडीसीने, अलीकडेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या ‘लोकांसाठी’ प्रायोगिक mRNA लसींची शिफारस केली आहे.
(हेही वाचा बालसुधारगृहात हत्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community