पीएच.डी. बरोबर दुसऱ्या पदवी अभ्यासक्रमास परवानगी नाही

80

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना पीएच.डी. वगळता अन्य अभ्यासक्रमांना लागू असतील असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही.

पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ मध्ये नमूद केल्यानुसार शैक्षणिक प्रक्रिया अनुभवाधिष्ठित, सर्वसमावेशक, संशोधनाधिष्ठित आणि विद्यार्थीकेंद्रित होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्या वृद्धिंगत करण्यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पूर्णवेळ शैक्षणिक अभ्यासक्रम करण्याची मुभा देण्याचा निर्णय यूजीसीने एप्रिलमध्ये घेतला होता. त्यानंतर आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या रचनेत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना यूजीसीने मार्गदर्शक सूचनांद्वारे दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रमांना उपस्थित राहता येण्यासाठी, दोन्ही अभ्यासक्रमांच्या वेळा अडचणीच्या ठरणार नाहीत याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.