आजारपणाला महागाईची झळ, औषधांमध्ये २० टक्क्यांची दरवाढ

महागाईने उच्चांक गाठला असतानाच, औषधांच्या किमतीदेखील वाढणार आहेत. औषध निर्मितीसाठी लागणा-या कच्च्या मालाची किंमत वाढल्याने औषधांच्या किमतीही २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी औषधनिर्मिती कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. एक हजारापेक्षा अधिक भारतीय औषध उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या गटाने केंद्र सरकारला ही विनंती केली आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्याने ही दरवाढ अपरिहार्य आहे असे, औषध निर्मिती करणा-या कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

नॉन शेड्यूल्ड औषधं महागणार

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेता येत नाहीत अशा नॉन शेड्यूल्ड औषधांच्या किमती १० टक्केच वाढवता येतात. परंतु कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे तब्बल २० टक्क्यांनी औषधे महागणार आहेत. इंडियन ड्रग्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IDMA) अनुसार मुख्य प्रारंभिक साहित्य, पॅकेजिंग साहित्य आणि वाहतूक खर्चासह सर्व खर्चावर परिणाम झाला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन, कंपन्यांना नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये १०% पेक्षा अतिरिक्त वाढ करण्याची परवानगी औषध उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या गटामार्फत देण्यात आली आहे.

( हेही वाचा : राज्य मंत्रीमंडळाची बैठक; ‘या’ विभागांसाठी घेतले महत्त्वपूर्ण निर्णय )

टंचाई निर्माण होण्याची शक्यता

पॅरासिटामॉलच्या किमतीत १३०% वाढ झाली आहे. ग्लिसरीन, प्रोपीलीन ग्लायकॉल, सिरप, ओरल ड्रॉप्स आणि निर्जंतुकीकरण तयारीसह प्रत्येक द्रव तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या किंमती अनुक्रमे ८३ ते २६३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळेच औषधांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता इंडियन ड्रग्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने वर्तवली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here