Bullet Train प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला वेग; पाचव्या प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पुलाचे बांधकाम पूर्ण

33

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून (NHSRCL) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad bullet train) प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरातमध्ये पाचव्या ‘प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट’ (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. (Bullet Train)

‘एनएचएसआरसीएल’ ने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्यात कोसांबाजवळ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग-४ (National Expressway-4) वरील २६० मीटर लांबीचा ‘पीएससी’ पूल शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी बांधून पूर्ण झाला. या पुलामध्ये १०४ प्रीकास्ट विभाग आहेत. यात ५० मी, अधिक ८० मी, अधिक ८० मी, अधिक ५० मी, अशा चार स्पॅनची संरचना आहे. हा पूल बॅलन्स्ड कँटिलीव्हर पद्धतीने बांधण्यात स्पॅनसाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. नवीन पूर्ण झालेला पूल सूरत आणि भरुच बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान स्थित आहे.

(हेही वाचा – Pune-Karnataka Bus सेवा बंदच; सीमेवरील नागरिकांना फटका)

राष्ट्रीय द्रुतंगती मार्ग-४ हा दिल्ली ते मुंबईदरम्यान बांधला जाणारा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या या पुलाच्या बांधकामाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आले होते. ज्यामुळे वाहनचालक आणि कामगार दोघांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली. तसेच, वाहतूक अखंडित सुरू राहील आणि जनतेला कमीत कमी गैरसोय होईल, याचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.