व्हॉट्सअ‍ॅपमुळे फोन हॅंग होतोय? मग हे करुन पहा

93

व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक गोष्टी सुरळीत झाल्या असल्या तरी त्यामुळे मोबाईलला वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक ग्रुप्स निर्माण झाले. राजकीय, सामाजिक आणि कार्यालयीन सुद्धा. या अ‍ॅपमुळे काम करणं सोपं झालं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपशिवाय जग असू शकतं, असा विचार करणं कोणालाही शक्य होणार नाही.

( हेही वाचा : ‘जाणता राजा’च्या आमंत्रणातून भाजपची नवी खेळी )

व्हॉट्सअ‍ॅपचे अनेक फायदे असले तरी बर्‍याचदा अतिरिक्त मेसेजेसमुळे फोन हॅंग होतो. व्यवस्थित चालत नाही. अशा वेळी महत्वाचं काम करणं कठीण होतं. व्हॉट्सअ‍ॅपचे मेसेजेस प्रत्येकवेळी डिलीट करणे अवघड असते. अशा परिस्थिती काय करावं हे वापरकर्त्यांना कळत नाही.

या समस्येतून सुटका मिळवण्याचा एक भन्नाट उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वात आधी व्हॉट्सअ‍ॅप मीडिया क्लिअर करण्यासाठी मॅनेज स्टोरेजमध्ये जाऊन Larger than 5MB वर क्लिक करा. इथे तुम्ही फाइल्सची निवड करुन डिलिट करु शकता. यासाठी तुम्ही Newest, Oldest आणि Largest कॅटेगरी निवडू शकता.

जर तुम्हाला खात्री असेल तर तुम्ही ऑल फाईल्स निवडून डिलिट करु शकता. तसेच तुम्ही Media auto-download हा पर्याय निवडून मोबाईल डेटा ऑटोमॅटिक डाऊनलोड होणार नाही याची काळजी घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर नियंत्रण मिळवू शकता आणि अधिक चांगल्या प्रकारे या बहुउपयोगी अ‍ॅपचा लाभ घेऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.