माणसाच्या शरीरात किडणीचं जितकं महत्व आहे तितकंच महत्व स्मार्टफोनमध्ये इंटरनेट असण्याला आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना स्वस्तात मस्त इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. पण याचा गैरफायदा काही सायबर गुन्हेगार करत असून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. टेलिकॉम कंपन्यांकडून देण्यात येणा-याया ऑफर्सचा आधार घेत हे गुन्हेगारांना मोफत इंटरनेट देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत.
सरकारने दिला सावधानतेचा इशारा
टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने हे गुन्हेगार ग्राहकांना एक लिंक पाठवून या लिंकवर क्लिक केल्यावर मोफत इंटरनेट सुविधा देण्यात येईल, असे सांगत आहेत. पण या लिंकच्या माध्यमातूनच ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक विंगकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना मिळणार 7 लाखांचा लाभ, त्यासाठी लवकर पूर्ण करा ‘हे’ काम)
We know 'free internet data offers' can be enticing but sometimes things are just too good to be true.
With this #PIBFactCheck, let's take a look at some important tips that will help you stay clear of online recharge frauds! pic.twitter.com/0Gsv1K0wTO
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 10, 2022
अशी होत आहे फसवणूक
या लिंकवर क्लिक केल्यास ग्राहकांच्या फोनमधील डेटा आणि इतर माहिती सायबर गुन्हेगारांकडून हॅक करण्यात येते. या लिंकच्या माध्यमातून ग्राहक धोकादायक वेबसाईटवर शिफ्ट होत असून त्या माध्यमातून ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांवर देखील नजर ठेवण्यात येते. त्यामुळे सरकारकडूनही ग्राहकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असून, अशा लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community