SBI बॅंकेकडून कोणत्याही हमीशिवाय विना व्याज २५ लाख कर्ज? पीआयबीने दिले स्पष्टीकरण

सोशल मिडियावर अनेक नव्या जाहिराती व्हायरल होत असतात यामुळे अनेकवेळा लोक या फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. युट्यूबवर सुद्धा सरकारच्या योजनांबाबत अनेक दावे केले जातात.

( हेही वाचा : फक्त ७५० रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर; २८ हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध)

युट्यूब चॅनेलचा दावा

सरकारच्या नारीशक्ती या योजनेद्वारे SBI देशातील सर्व महिलांना हमीशिवाय आणि व्याजाशिवाय २५ लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. हा मेसेज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि युट्यूबच्या सुद्धा अनेक चॅनेलवर असा दावा केला जात आहे, तर काही युट्यूब चॅनेलवर प्रधानमंत्री कन्या सन्मान योजनेअंतर्गत दर महिन्याला २५०० रुपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु या योजना नेमक्या खऱ्या आहेत का याबाबत पीआयबीने स्पष्टीकरण दिले आहे.

पीआयबीने दिले स्पष्टीकरण

पीआयबीने अशा सर्व योजना बनावट आहेत असे स्पष्ट केले आहे. काही युट्यूब माध्यमांवरून सरकारी योजनांशी संबंधित माहिती दिली जात आहे ही माहिती खरी नाही. याद्वारे नागरिकांची फसवणूक होऊ शकते अशा जाहिरातींना बळी पडू नका असे पीआयबीने आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिलेल्या वेबसाइटवर तुमची माहिती कधीही शेअर करू नका याचा गैरवापर होऊ शकतो असेही पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here