150 फूट खोल दरीत सहलीची बस कोसळली, पण…

118

पुण्यातील लोहगड जवळील दुधीवरे खिंडीमध्ये पेण येथील एका क्लासची सहलीची बस दरीत पडून अपघात झाल्याची घटना रविवार, 4 डिसेंबर रोजी घडली. याबाबत प्राथमिक माहिती देताना, सचिन भोर्डे, पोलीस पाटील लोहगाव म्हणाले की, आर्या क्लासेस, पेण यांच्या बसला हा गंभीर अपघात झाला. आर्या क्लासेस, पेण यांचे एकूण 4 बस मधून विद्यार्थी व शिक्षक असे एकूण 90 जण सहलीसाठी लोहगड किल्ला पाहण्यासाठी आले होते.

बसमध्ये २७ विद्यार्थी होते

किल्ला पाहिल्यानंतर दुपारी ते परत पाहिला जाण्यासाठी निघाले होते. चार बसेस पैकी तीन बस पुढे व्यवस्थित गेल्या. पण शेवटची चौथी बस दुधीवरे खिंडीमधून जात असताना 150 ते 200 फूट खोल दरीत पडल्याने कोसळून दुपारी तीन वाजता सुमारास गंभीर अपघात झाला. अपघातग्रस्त बसमधून 27 जण प्रवास करत होते, बस खाली दरीत पडल्यानंतर उलटली. असे असूनही अपघातग्रस्त बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एकही विद्यार्थी जखमी झाला नाही.

(हेही वाचा गुजरातमध्ये शाही इमाम म्हणतात, मुसलमानांनी एकजूट होऊन भाजपाला मतदान करू नये)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.