Pilgrim Darshan Scheme: देशातील तीर्थस्थळांचे दर्शन घेणे होणार सोपे, राज्य सरकारकडे केली ‘या’ योजनेची मागणी

207
Mukhyamantri Teerth Darshan Yojana मध्ये आणखी ११० तीर्थ क्षेत्रांचा समावेश

महाराष्ट्राला संत-वारकरी पंथाची परंपरा लाभली आहे. याकरिता देशातील तीर्थक्षेत्रांचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबावे, तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी, यासाठी राज्य सरकारने तीर्थ दर्शन योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (Pilgrim Darshan Scheme)

या योजनेअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नाश्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तिथे बसने प्रवास, तीर्थयात्रेत गाईड, एकट्या ज्येष्ठ नागरिकाला केअर टेकर, अशा विविध सुविधा देऊन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडणे, सोपे होणार आहे.

(हेही वाचा – World Hearing Day दिवसानिमित्त २५० मुलांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप)

हजारो ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना लागू करण्यासाठी खर्चाची तरतदू, नियमावली, अंमलबजावणी यंत्रणा, त्याचप्रमाणे ही लागू करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश दिल्यास ही योजना राज्यात लागू होऊ शकते. प्रत्येक जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात १ हजार लाभार्थी या योजनेत आले, तरी हजारो ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचे दर्शन घडवता येईल. हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मीयांच्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांचाही या योजनेत समावेश करण्यात येईल, असे सरनाईक यांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.