कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरिन गॅसगळती झाल्यामुळे १९ जणांना विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यामुळे आता प्रशासनाकडून तलावातील पाणी शुद्धीकरणासाठी गॅसऐवजी क्लोरिन पावडर (Chlorine powder) वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pimpri-Chinchwad)
संभाजीनगर येथील जलतरण तलावात (swimming pool) क्लोरिन पावडरद्वारे पाणी शुद्ध करून जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळेने पावडर वापरण्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे. त्यानुसार, पावडरचा वापर करूनच तलावातील पाणी शुद्ध केले जाणार असल्याचे क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict: ‘गाझा रिकामे करावे अन्यथा…’ इस्त्रायलचा पॅलेस्टाईन नागरिकांना शेवटचा इशारा )
पिंपरी-चिंचवड कासारवाडीतील घटनेनंतर बंद ठेवलेले सातपैकी पिंपळे गुरव, पिंपरीगाव, संभाजीनगर, वडमुखवाडी, नेहरुनगर हे ५ तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.