Piyush Goyal : खासदार पियूष गोयल यांच्यासाठी महापालिका मुख्यालयच हलवले बोरीवलीत

2939
Piyush Goyal : खासदार पियूष गोयल यांच्यासाठी महापालिका मुख्यालयच हलवले बोरीवलीत
Piyush Goyal : खासदार पियूष गोयल यांच्यासाठी महापालिका मुख्यालयच हलवले बोरीवलीत
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

उत्तर मुंबईतील भाजपाचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी आपल्या लोकसभा मतदार संघातील विविध विकास कामे, प्रकल्प कामे आणि योजनांना गती देण्यासाठी आढावा बैठक बोरीवलीतील आर मध्य विभाग कार्यालयात आयोजित केली. विशेष म्हणजे या बैठकीसाठी महापालिकेचे मुख्यालयच बोरीवलीत दिवसभरासाठी हलवण्यात आले होते. महापालिका आयुक्त, तीन अतिरिक्त आयुक्त तसेच सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. त्यामुळे खासदारांच्या एका बैठकीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची फौज बोरीवलीतील महापालिका कार्यालयात हलवण्यात आल्याने महापालिका मुख्यालयच संध्याकाळपर्यंत ओस पडले होते. त्यामुळे सरकारपुढे नतमस्तक होऊन प्रशासनाचे अधिकारी अशाप्रकारे नाक घासू लागले तरी उद्या हा पायंडा पडेल आणि इतरही खासदार मतदार संघातील विभाग कार्यालयात बैठका घेण्यास भाग पाडतील अशी भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

उत्तर मुंबईतील विकासात्मक प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी बुधवारी बोरिवली येथे व्यापक आढावा बैठक घेतली. दोन तासांच्या मॅरेथॉन सत्रात महापालिका, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए, क्रीडा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासह विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोयल यांनी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि निर्धारित मुदतीत ते पुर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

(हेही वाचा – BMC : पदपथावरील फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश, पण बैठकीचे इतिवृत्तांतच उपलब्ध नाही!)

उत्तर मुंबईतील १९ विकास योजनांमध्ये पुनर्विकास, पायाभूत सुविधांची वाढ, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सेवा, टोल प्लाझा, शहर सुशोभीकरण आणि प्रदूषण नियंत्रण यासह विविध समस्यांचा समावेश आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अभिजीत बांगर यांच्यासह सहआयुक्त, उपायुक्त, खाते प्रमुख आणि विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि एसआरए, म्हाडाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या बैठकीत विविध प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती दिली.

महापालिकेच्या इतिहासात एकाद्या खासदाराने मतदार संघातील विकास कामांची आढावा बैठक ही कधीही मुख्यालय वगळता विभाग कार्यालयात घेतली नव्हती. आजवर सर्व बैठका या मुख्यालयातच झालेल्या आहेत. परंतु विभाग कार्यालयात एखाद्या खासदाराने आढावा बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून यापुढे मग याच्या आधारे सर्वच खासदर मागणी करतीत आणि त्या खासदाराच्या मागणीनुसार मुख्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांना विभाग कार्यालयात जावे लागेल. त्यामुळे आयुक्त भुषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी खासदारांना मुख्यालयात बैठक घेण्याची विनंती करायला हवी होती, परंतु, तसे न करता त्यांची मागणी मान्य केल्याने यापुढे मुख्यालयात आयुक्तांनी बैठका घेऊनच नये,अशी नाराजी एकप्रकारे अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.