स्वयं-पुनर्विकास योजनेंतर्गत आणखी १ हजार ५०० गृहनिर्माण सोसायट्यांचे विकास होणार; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे विधान

58
स्वयं-पुनर्विकास योजनेंतर्गत आणखी १ हजार ५०० गृहनिर्माण सोसायट्यांचे विकास होणार; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे विधान
स्वयं-पुनर्विकास योजनेंतर्गत आणखी १ हजार ५०० गृहनिर्माण सोसायट्यांचे विकास होणार; केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज चारकोप श्वेतांबरा स्वयं-पुनर्विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प नागरिकांना स्वतःचे घर विकसित करण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Mumbai District Central Co-operative Bank Ltd) सहकार्याने हा प्रकल्प विकसित केला जात असून, याचा उद्देश सामान्य नागरिकांना स्थायी निवास उपलब्ध करून देणे व बिल्डरांच्या शोषणातून मुक्त करणे हा आहे.

( हेही वाचा : Bihar मध्ये मंत्रिमंडळ विस्तार, भाजपाच्या ७ जणांनी घेतली शपथ

गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर १ येथील राजे शिवाजी मैदानात मंगळवारी कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी, विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) , आमदार प्रकाश सुर्वे, आमदार चित्रा वाघ, माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार विजय गिरकर आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी स्वयं-पुनर्विकासाच्या महत्त्वावर भर देत म्हणाले, लोकांनी आता आपल्या भविष्यातील निर्णय स्वतः घ्यायला हवेत. बिल्डरांच्या शोषणाचे दिवस आता संपले आहेत. केवळ उत्तर मुंबईतच १५ सोसायट्या याआधी पुनर्विकसित झाल्या असून, लवकरच आणखी १,५०० सोसायट्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. केंद्र सरकार अशा उपक्रमांना पूर्ण पाठिंबा देण्यास कटिबद्ध आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गोयल म्हणाले की, महाराष्ट्राच्या पायाभूत विकासासाठी त्यांचे योगदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. तसेच, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सर्वांसाठी घरे’ हे स्वप्न आता साकार होत आहे. आगामी ट्रिपल इंजिन सरकार अधिक वेगाने काम करेल आणि सर्वांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करेल,” असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही योजना मराठी माणसासाठी एक सुवर्णसंधी आहे. पहिल्यांदाच एका सर्वसामान्य मराठी नागरिकाला १,१०० चौरस फूटाचे प्रशस्त घर मिळत आहे. यामुळे स्थानिक कुटुंबे मुंबईत राहू शकतील आणि प्रॉपर्टीच्या वाढत्या किंमतींमुळे विस्थापित होणार नाहीत. कोणताही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. तसेच क्लस्टर आधारित स्वयंपुनर्विकास अधिकाधिक प्रोत्साहित केला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची घोषणा

१. मागाठाणे येथे एक हजार खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे.
२. कांदिवली (प) चारकोप येथे ही आणखी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे.
३. वर्सोवा ते भाईंदर पर्यंत कोस्टल रोडच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे, ज्यामुळे उत्तर मुंबई आदर्श शहरी भाग बनेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी दिली.

उत्तर मुंबईतील महायुतीची (Mahayuti) ताकद

कार्यक्रमादरम्यान, पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वासन दिले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीत ३८ हून अधिक नगरसेवक निवडून येतील, जे मजबूत ट्रिपल इंजिन सरकार स्थापन करतील.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.