-
ऋजुता लुकतुके
जून महिन्यात टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवली होती. वाटाघाटींच्या दुसऱ्या टप्प्यात आता वाणिज्यमंत्री पीयूष गोयल एलॉन मस्क यांची भेट घेणार आहेत. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
वाणिज्यमंत्री पीयूष गोयल पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत आणि तेव्हा ते टेस्लाचे मालक आणि संस्थापक एलॉन मस्क यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. मस्क यांना टेस्ला कार दक्षिण आशियाई बाजारपेठेत उतरवायची आहे. त्यासाठी त्यांची पहिली पसंती भारताला आहे. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
रॉयटर्सने या विषयीची बातमी दिली आहे. यावर्षी जून महिन्यात मस्क यांनी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आणि तयारीही मस्क यांनी बोलून दाखवली होती. आता त्याचा पुढील टप्पा म्हणून मस्क वाणिज्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं समजतंय. गोयल यांच्या अमेरिका दौऱ्यातील ही सगळ्यात हाय-प्रोफाईल बैठक असेल. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
मस्क यांना भारतात टेस्लाचं उत्पादन सुरू करायचं आहे. तसंच तसंच या इलेक्ट्रिक गाडीचे सुटे भाग भारतातून बनवून घेण्याचीही त्यांची योजना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात देशभरात चार्जिंग युनिट्स बसवण्याची त्यांची योजना आहे, असं रॉयटर्सने आपल्या बातमीत म्हटलं आहे. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
(हेही वाचा – Nitish Kumar : नितीश कुमार यांचे आक्षेपार्ह कृत्य; श्रद्धांजलीसाठीची फुले उधळली)
यासाठी पोषक वातावरण भारतात तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. भारतात ई-कारचं संपूर्ण उत्पादन एखाद्या परदेशी कंपनीने केलं तर त्यांना भारतातील करात विशेष सवलत मिळणार आहे. या कंपन्यांनी भारतातील स्थानिक कंपन्यांशी सहकार्याने हे उत्पादन करावं आणि काही सुटे भाग भारतातून घ्यावे इतकीच अट यामध्ये आहे. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
केंद्र सरकार सध्या नवीन ई-वाहन उत्पादन धोरण तयार करत आहे. यात परदेशी कंपन्यांसाठीच्या सवलती आणि नियम व अटी स्पष्ट केल्या जातील. या धोरणाच्या पार्श्वभूमीवर मस्क आणि गोयल यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जातेय. २०२१ मध्ये टेस्ला कंपनीने भारतात आपली कार आणण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केला होता. पण, भारतातले काही सुटे भाग वापरायला त्यांनी नकार दिल्यावर ही बोलणी अर्धवट थांबवण्यात आली होती. सध्या मागेच पाच महिने टेस्ला आणि भारतीय प्रशासन यांच्यात पुन्हा वाटाघाटी सुरू आहेत. (Piyush Goyal to Meet Elon Musk)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community