महाराष्ट्राला काश्मीरची साद!

139

काश्मिर फाईल्स या चित्रपटावरुन पुन्हा एकदा काश्मिर चर्चेत आले आहे. तसेही काश्मिर कायमच चर्चेत असते. अतिरेक्यांच्या कारवायांमुळे सतत येथे दहशतीचे वातावरण असले, तरी तिथली निसर्गसंपन्नता कायमच पर्यटकांना भूरळ घालत असते. आता काश्मीर पर्यटन विभागानेच महाराष्ट्रातील पर्यटकांना साद घातली आहे. ‘मिशन युथ’ अंतर्गत महाराष्ट्र काश्मीर संयुक्त पर्यटन उपक्रमाची आखणीही  केली जात आहे.

जम्मू काश्मिर पर्यटनाचा सहभाग

‘अतुल्य भारत’ संकल्पनेवर आधारित तीन दिवसांचा ओटीएम कार्यक्रम गोरेगाव येथे झाला. यात जम्मू- काश्मीर पर्यटनाने सहभाग घेतला होता. काश्मीर पर्यटन चे संचालक डाॅ. जी. एन. इट,  ‘शेर-ए- काश्मीर’ आंतरराष्ट्रीय परिषदत केंद्राचे संचालक बक्षी जावेद हिमायून, जम्मू पर्यटन महामंडळाचे सचिव मानव गुप्ता यावेळी उपस्थित होते.

( हेही वाचा: कामाला लागा… मीही घराबाहेर येतोय!; कोणाला आवाहन, कोणाला इशारा? )

ही गर्दी कायम राहावी

कोरोना काळ असतानाही काश्मीरमधील पर्यटकसंख्या 6 लाख 65 हजार एवढी होती. गुलमर्ग, श्रीनगर, पहलगाम, पटनीटाॅप, सोनमर्ग ही पर्यटनस्थळे देशातील पर्यटन स्थळे देशातील पर्यटकांनी फुलली होती. त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकडा मोठा असल्याचे डाॅ. जी. एन. इटू यांनी सांगितले. पर्यटकांची ही गर्दी 2022 मध्येही कायम राहावी. लोकप्रिय पर्यटनस्थळांबरोबर जम्मू काश्मीर मध्ये इतरही अनेक गोष्टी पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.