Scheme for Ex-Agniveer: माजी अग्निवीरांसाठी खुशखबर! केंद्रीय सशस्त्र दलात १०% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा 

98
Scheme for Ex-Agniveer: माजी अग्निवीरांसाठी खुशखबर! केंद्रीय सशस्त्र दलात १०% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा 
Scheme for Ex-Agniveer: माजी अग्निवीरांसाठी खुशखबर! केंद्रीय सशस्त्र दलात १०% पदे राखीव, गृह मंत्रालयाची मोठी घोषणा 

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेबाबत (Agneepath Scheme) गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान आता या वादावर पडदा पडण्याची वेळ आली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने माजी अग्निवीरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. (Scheme for Ex-Agniveer)

केंद्र सरकारने सांगितल्यानुसार, अग्निवीराने आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्याला सीआयएसएप, बीएसएफ, सीआरपीएफ, आरपीएफ यांसारख्या केंद्रीय सशस्त्र दलात नोकरीची संधी दिली जाईल. त्यांच्यासाठी १० टक्के पदे राखीव  (Agniveer reserves 10 percent posts) ठेवली जातील आणि शारीरिक चाचणीतदेखील शिथिलता दिली जाईल. (Scheme for Ex-Agniveer)

(हेही वाचा – Hotel : हाॅटेल व्यावसायिक श्री अराहा हाॅस्पिटॅलिटी प्रा.लि. कडून कोट्यवधी रुपयांची कर चुकवेगिरी)

मिळालेल्या माहीतीनुसार, बीएसएफचे डीजी नितीन अग्रवाल म्हणाले की, माजी अग्निवीर जवानांकडे चार वर्षांचा अनुभव असेल. ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित असतील. बीएसएफसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. छोट्या प्रशिक्षणानंतर त्यांना देशाच्या सीमेवर तैनात केले जाईल. तर, CISF च्या डीजी नीना सिंह यांनी सांगितले की, सीआयएसएफनेही यासंदर्भात सर्व तयारी केली आहे. CRPF चे डीजी अनिश दयाल सिंह यांनीदेखील भरती प्रक्रीयेची सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. शिवाय, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला CRPF च्या वयोमर्यादेत ५ वर्षांची सवलत दिली जाईल, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – Legislative Council Elections : काँग्रेसला आपल्या आमदारांवरही भरोसा नाय काय?)

एसएसबीचे डीजी दलजित सिंग यांनी म्हटले की, आमच्या दलात अग्नीवीरांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या तुकडीसाठी ५ वर्षांची सूटही दिली जाईल. तसेच, त्यांना कोणतीही शारीरिक चाचणी द्यावी लागणार नाही. याशिवाय, आरपीएफचे महासंचालक मनोज यादव म्हणाले की, भविष्यात रेल्वे संरक्षण दलातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या सर्व भरतींमध्ये माजी अग्नीवीरांना १० टक्के आरक्षण असेल.

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.