Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने श्री जीवदानी देवी मंदिराच्या डोंगर पायथ्याशी वृक्षारोपण

विरार पूर्व येथे जीवदानी देवी मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी १४१ रोपे लावून त्या रोपांचे ३ वर्षांकरिता संवर्धन करण्याचा संकल्प 'एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट' तर्फे करण्यात आला आहे.

88
२८ मे २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीला १४१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने विरार येथील ‘एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम १५ जून २०२४ ला राबवण्यात आला. या उपक्रमाला विरार येथीलच वीर सावरकर मित्र मंडळानेही पूर्ण योगदान दिले. हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. श्री जीवदानी संस्थान यांच्या परवानगीने वन खात्याची जमीन आणि भारतीय रोपे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच वृक्षारोपणाला आपले पूर्ण सहकार्य दिले.
tree 1
विरार पूर्व येथे जीवदानी देवी मंदिर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी १४१ रोपे लावून त्या रोपांचे ३ वर्षांकरिता संवर्धन करण्याचा संकल्प ‘एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे करण्यात आला आहे. या वृक्षरोपणाला वसई-विरार शहर महानरपालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या हस्ते प्रथम रोप लावून सुरुवात करण्यात आली. वृक्षारोपणाला स्थानिक सर्व सावरकरप्रेमी यांनी सहभाग घेतला. प्रत्येक रोप लावल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) जय घोष करण्यात आला. वृक्षप्रेमी आणि सावरकर प्रेमी यांचा अनोखा संगम येथे पहायला मिळाला. या ठिकाणी रोपण करण्यात आलेल्या प्रत्येक रोपाची अक्षांश आणि रेखांश सहित नोंद ठेवण्याची सोय केली जाईल, तसेच तीन वर्ष स्वखर्चाने या रोपांचे संवर्धन करण्याचे वचन या वेळेस ‘एक हात मदतीचा चॅरिटेबल ट्रस्ट’ चे विश्वस्त उमेश गुप्ता यांनी दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.