कोरोना काळात रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली होती. यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी पाहून मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ मोजक्याच स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरूपाची असेल अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे असेही मध्य रेल्वेने ट्वीट करत स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : बेस्टचे कंत्राटी कामगार संपावर; ऐन दिवाळीत प्रवाशांची होणार गैरसोय)
प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये
सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar), ठाणे (Thane), कल्याण ( Kalyan) , लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल (Panvel) रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५० रुपये करण्यात आली आहे. दिवाळीत बाजारपेठांसह अनेक लोक बाहेरगावी निघाल्यामुळे रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. वाढत्या गर्दीमुळे मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Heavy rush due to festivals are observed at the stations.
To curb excessive rush of passengers at CSMT, Dadar, Thane, Kalyan, LTT & Panvel Railway stations the fare of Platform ticket is increased to Rs.50/-frm 22.10 to 31.10.’22 (as a temporary measure) at THESE STATIONS ONLY.
— Central Railway (@Central_Railway) October 21, 2022
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागाने सुद्धा कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Join Our WhatsApp Community