पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 18 ते 31 मे या चौदा दिवसांसाठी लागू असेल. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रुपयांऐवजी 30 रुपये इतकी असणार आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट महागले
कोरोनाकाळात रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासावर निर्बंध घातले होते. नंतर त्यात बदल करून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म व आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. अजूनही रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील आणि जनरल तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे अशा प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी न करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ विरोधात टाटा मोटर्सची मुंबई उच्च न्यायालयात धाव )
कोरोना काळात प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा कहर आटोक्यात आल्यानंतर पुन्हा हे दर कमी करण्यात आले. मात्र आता पुन्हा स्थानकांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढीचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community