उन्हाळ्यात गावाकडे जाणा-यांची संख्या अधिक असते. पण त्याहून जास्त त्यांना सोडण्यासाठी येणा-या लोकांची प्लॅटफाॅर्मवर प्रचंड गर्दी असते. तसेच, उन्हाळी हंगामात अलार्म चेन पुलिंगच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटांची किंमत 10 ते 50 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सागंण्यात आले आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकात प्लॅटफाॅर्म तिकीटांची किंमत तात्पुरती वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
9 मे ते 23 मे पर्यंत 15 दिवसांसाठी ही वाढ करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा: अरविंद केजरीवालांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा )
…म्हणून घेण्यात आला निर्णय
प्लॅटफाॅर्म तिकीटांच्या दरांत करण्यात आलेली ही वाढ तात्पुरती असल्याचे, रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा 15 दिवसांनंतर हे तिकीटदर कमी केले जाऊ शकतात. पण असे असूनही होणारे गैरप्रकार जर थांबले नाहीत, तर मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेचा या निर्णयाबाबत विचार सुरु होता. आता अखेर सीएसटी, दादर, ठाणे, LTT, कल्याण, पनवेल या गर्दी होणा-या आणि प्रवाशांची सर्वात जास्त रहदारी असणा-या स्थानकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community