
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
समान काम, समान दाम या मागणीसाठी बेस्ट उपक्रमातील खासगी कंत्राटदारांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. याचा थेट परिणाम बेस्टच्या बस फेऱ्यांवर झाला. प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या १९६९ शेडुल्डवरील बसेस पैकी १३९१ बसेस रस्त्यावर धावू शकल्या. बेस्ट उपक्रमाने आपल्या चालक आणि वाहकांच्या मदतीने बस सेवा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केला असला तरी याचा परिणाम मोठ्याप्रमाणात दिसून आला. शाळकरी मुलांसह महिलांना बसच्या प्रतीक्षेत खासगी टॅक्सी तथा रिक्षाचा आधार घ्यावा लागला तर काहींना चालतच कार्यालय तथा घर गाठावे लागले. (BEST Contract Workers Strike)
(हेही वाचा – BMC च्या कार्यकारी सहायक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; इथे जाऊन पाहू शकता निकाल)
बेस्ट मधील कंत्राटी बसवरील कामगारांचा “समान कामाला समान दाम” साठी मोर्चा मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी बेस्ट कामगार नेते शशांक राव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता या मोर्चात कंत्राटी कामगार सहभागी झाल्याने मंगळवारी कमी बसगाड्या डेपोतून बाहेर पडल्या. या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे काम तंतोतंत बेस्ट कर्मचाऱ्यासारखेच असल्याने आणि हे काम बारमाही, कायम स्वरूपाचे असल्याने या कामगारांना “समान कामाला, समान दाम” या तत्वानुसार बेस्ट उपक्रमामधील समकक्ष कायम व नियमित कामगारांना लागू असलेले वेतन व इतर सेवाशर्ती तातडीने लागू करण्यात यावे व इतर मागण्यांकरिता काल, सोमवारी आझाद मैदान येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाद्वारे नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन देण्यात आले असल्याचे युनियनने स्पष्ट केले. (BEST Contract Workers Strike)
(हेही वाचा – ‘आप’च्या सत्ताकाळात Delhi Transport Corporation च्या तोट्यात ३५ हजार कोटींनी वाढ; कॅगच्या अहवालात उघडकीस)
मातेश्वरी कंपनीच्या ५९० शेड्युल्डवरील बसपैकी फक्त ३०८ बस रस्त्यावर धावल्या असून २८२ बसेस रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत मारुतीच्या ६२५ पैकी ५०६ बसेस, टाटाच्या ३४० पैकी १८१ बसेस इ-ट्रान्स कंपनीच्या ३२४ पैकी ३०९ बसेस, ओलेक्ट्रा कंपनीच्या सर्व म्हणजे ४० बसेस स्विच ५० पैकी ४७ बसे रस्त्यावर आल्या. म्हणजे १९६९ शेडुल्डवरील बसेस पैकी १३९१ बसेस रस्त्यावर धावू शकल्या असून ५७८ बसेस रस्त्यावर धावू शकल्या नाहीत. मातेश्वरी कंपनीच्या वडाळा डेपोमध्ये बस चालक-वाहकांनी संपादरम्यान काही बसचे नुकसान केल्याची माहिती मिळते. या घटनेमुळे बेस्ट उपक्रमाला अतिरिक्त आर्थिक फटका बसला असल्याची शक्यता आहे. कंत्राटाच्या अटींनुसार कोणतीही बस रस्त्यावर न आणल्यास कंत्राटदार कंपनीकडून प्रति बस प्रतिदिन पाच हजार रुपये दंड आकारला जातो. महिन्याच्या अखेरीस हा दंडात्मक हिशेब करून कंत्राटदाराच्या बिलातून कपात केली जाते. असेही बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले. (BEST Contract Workers Strike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community