पीएम गतिशक्ती अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नियोजन गटाची (एनपीजी) ५३ व्या बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. क्षेत्र विकास दृष्टीकोनाबाबतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, चर्चा झालेले हे प्रकल्प सामाजिक आर्थिक विकासाकरिता मल्टी मॉडल कनेक्टिविटी पुरवतील आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करतील असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिवांनी अधोरेखित केले.
(हेही वाचा – ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ आणि ‘शिवाजी ब्रीज रेल्वे स्थानकाच्या’ नामांतराची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी)
हे प्रकल्प भविष्यकालीन क्षमतावृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि प्रकल्पक्षेत्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेमध्ये वाढ करतील. या बैठकीत ३ रेल्वे प्रकल्प आणि ३ रस्ते प्रकल्प अशा एकूण २८,८७५.१६ कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. यावेळी या गटाने महाराष्ट्रातील वैभववाडी-कोल्हापूर या ३४११.१७ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाची देखील शिफारस केली. या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात मूल्यमापन करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community