PM Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत ११३ कंपन्यांकडून ९०,८०० नोकरीच्या संधी

ज्युबिलंट फूडवर्क्स, मारिती सुझुकी यासारख्या कंपन्यांनी या उपक्रमात इंटर्नशिप देऊ केली आहे.

228
PM Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत ११३ कंपन्यांकडून ९०,८०० नोकरीच्या संधी
PM Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत ११३ कंपन्यांकडून ९०,८०० नोकरीच्या संधी
  • ऋजुता लुकतुके

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी (PM Internship Scheme) तरुणांची नोंदणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या आठवड्यात या पोर्टलला तरुणांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी, वित्त आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांनीही तरुणांना इंटर्नशिप देऊ केली आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत या पोर्टलवर १९३ कंपन्यांनी आपल्याकडील ९०,८०० जागा या योजने अंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत. या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, ज्युबिलंट फूड्स, मुथुत फायनान्स, एल एँड टी या कंपन्यांचाही समावेश आहे. रिलायन्स कंपनीनेही आपली जाहिरात दिली आहे.

३ ऑक्टोबरला इंटर्नशिप योजनेसाठीचं (PM Internship Scheme) पोर्टल सुरू करण्यात आलं होतं. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केंद्रसरकारने पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रुपयाची तरतूद इंटर्नशिपसाठी केली आहे. १,२५,००० तरुणांना या अंतर्गत इंटर्नशिप देण्यात येणार आहे, तर पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत चालेल.

(हेही वाचा – काँग्रेसला धक्का…आमदार Sulbha Khodke पक्ष सोडणार; सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून केले निलंबित)

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून हा कार्यक्रम नियंत्रित केला जात आहे. तेल कंपन्यांकडून या उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याचं मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मीडियाला सांगितलं आहे. त्यानंतर पर्यटन, वाहन उद्योग आणि वित्तीय संस्थांनी नोंदणी केली आहे. ३६ राज्यांतील ७३७ जिल्ह्यांमध्ये या संधी उपलब्ध असल्याचं नोंदणीवरून दिसत आहे. कंपन्यांच्या नोंदणीनंतर आता उमेदवारांच्या नोदणीलाही १२ ऑक्टोबरपासूनच सुरुवात झाली आहे. २ डिसेंबरपासून पहिली इंटर्नशिप सुरू होणार आहे.

आर्थिक वर्ष २०२५ साठीचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) जाहीर केली होती. २१ ते २४ वर्षे वयोगटातील १ कोटी तरुणांना ६ वर्षांच्या कालावधीत इंटर्नशिप देण्याचा हा कार्यक्रम आहे. या अंतर्गत नेमणूक झालेल्या तरुणांना सरकारकडून महिन्याला ५,००० रुपयांचा भत्ता आणि एकदाच ६,००० रुपयांचा सुरक्षा निधी दिला जाणार आहे. ही नियुक्ती १२ महिन्यांसाठी असेल.

या योजनेसाठी https://pminternship.mca.gov.in/login/ या वेबसाईटवर जाऊन तरुणांनी नोंदणी करायची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.