- ऋजुता लुकतुके
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १७ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी केला असून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे सुमारे ९.३ कोटी शेतकऱ्यांना १७ व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. (PM Kisan Yojana)
पीएम किसानच्या सतराव्या हप्त्याअंतर्गत सुमारे २० हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. त्याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशाश्वमेध घाटावर प्रार्थना केली आणि काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. (PM Kisan Yojana)
काही शेतकऱ्यांनी हे पैसे न मिळाल्यामुळे तक्रार केली आहे. पण, याचं कारण मुख्यत्वे ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीचा अभाव. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी केल्या नसतील त्यांना पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. (PM Kisan Yojana)
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने आज उत्तर प्रदेश के वाराणसी से ‘पीएम किसान सम्मान निधि’ की 17वीं किस्त के तहत 9.26 करोड़ से अधिक लाभार्थी किसानों के खातों में ₹20,000 करोड़ से अधिक की राशि हस्तांतरित की। #PMKisanSamman pic.twitter.com/BcDiCMYHi2
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) June 18, 2024
(हेही वाचा – Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश)
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला, तेव्हापासून देशभरातील कोट्यवधी शेतकरी १७ व्या हप्त्याची वाट पाहत होते. आज सतरावा हप्ता रिलीज झाल्यानंतर त्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. पीएम किसान अंतर्गत आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांना ३.०४ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. (PM Kisan Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community