नांदेड जल्ह्यातील आसेगावमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. यामध्ये हळद काढणी करणाऱ्या १० महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला. यामध्ये ७ महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील सर्व महिला मजूर या हिंगोलीतील गुंज तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
हेही वाचा-ऐरोलीमध्ये मँग्रोव्ह पार्कच्या उभारणीसाठी अभ्यास अहवाल तयार करा; वनमंत्री Ganesh Naik यांचे निर्देश
अपघातग्रस्त मजूरांना वाचवण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रशासनाकडून प्रयत्न केले यामध्ये तीन महिलांना वाचवण्यात यश आले. दरम्यान या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल कळाल्यानंतर दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. या दुर्घटनेतील पिडीतांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.”
हेही पहा-
Join Our WhatsApp Community