डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
तुमच्यासह काम करण्यास इच्छुक – नरेंद्र मोदी
“माझे प्रिय मित्र आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदी तुम्ही विराजमान झाला आहात. या ऐतिहासिक दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. आपल्या दोघांच्या देशांसाठी प्रगती आणि विकासाच्या संधी तसंच भविष्याला आकार देण्यासाठीच्या दृष्टीने तुमच्यासह काम करु इच्छितो, त्यासाठी मी उत्सुक आहे. तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी तुम्हाला शुभेच्छा ” या आशयाची पोस्ट लिहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सोहळ्याला कोण कोण उपस्थित होते?
शपथविधी सोहळ्याला जो बायडेन (Joe Biden) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त कमला हॅरिस देखील उपस्थित होत्या. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनीही या समारंभाला उपस्थिती लावली. या वेळी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश ज्युनियर आणि त्यांच्या पत्नी लारा बुश देखील उपस्थित होते. देशातील सर्व वरिष्ठ राजकारण्यांव्यतिरिक्त, लष्कर आणि गुप्तचर विभागाचे उच्च अधिकारी देखील उपस्थित होते. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हेदेखील उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स (J.D. Vance) यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट यांनी ट्रम्प यांना शपथ दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community