पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दुबईत (Dubai) सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जलवायू कारवाई शिखर संमेलनाला (World Climate Action Summit) उपस्थित राहिले आहेत. या संमेलनाला त्यांनी संबोधित केले. या वेळी त्यांनी पुढची COP33 ही आंतरराष्ट्रीय हवामान बदल समिट भारतात घेण्याचा प्रस्ताव ठेवला. (PM Modi In COP28)
‘भारत राष्ट्रीय स्तरावर निश्चित करण्यात आलेले ध्येय प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे. निश्चित केलेल्या वेळापूर्वीच ११ वर्षे आधीच भारताने कार्बन उत्सर्जन तीव्रतेचे लक्ष साध्य केले आहे’, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.
(हेही वाचा – PM Modi Dubai Visit : पंतप्रधान मोदींचे दुबईत भव्य स्वागत; जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत सहभाग)
पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत चांगला समन्वय
या शिखर संमेलनात मोदी म्हणाले, “पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यामध्ये संतुलन राखल्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून भारत जगासमोर उभा आहे. भारतात जगातील १७ टक्के लोक राहतात. याशिवाय वैश्विक कार्बन उत्सर्जनात भारताचे योगदान ४ टक्क्यांहून कमी आहे. भारताने पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत खूपच चांगला समन्वय राखत जगासमोर विकासाचे एक मॉडेल सादर केले आहे.”
भारत जलवायू परिवर्तन प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्कसाठी प्रतिबद्ध आहे, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले. (PM Modi In COP28)
जागतिक नेत्यांशी संवाद
जागतिक हवामान कृती शिखर परिषदेसाठी (COP28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि इतर जागतिक नेत्यांसह दुबईत जमले आहेत. शुक्रवार, १ डिसेंबर रोजी शिखर परिषदेला सुरुवात होताच नेत्यांनी पारंपरिक ‘फॅमिली फोटो’ काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन यांच्यासह विविध जागतिक नेत्यांशी संवाद साधताना दिसले. ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी इतर जागतिक नेत्यांसोबत कौटुंबिक फोटोसाठी पोझ दिली. (PM Modi In COP28)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community