पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या फेरी सेवेचा शुभारंभ केला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील राजनैतिक आणि आर्थिक संबंधांमध्ये आम्ही नवीन अध्याय सुरू करत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.(India- Srilanka ferry)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि श्रीलंकेचा संस्कृती, वाणिज्य आणि सभ्यतेचा सखोल इतिहास आहे आणि आता दोघांमधील आर्थिक भागीदारी देखील वाढेल. नागपट्टिनम आणि कानकेसंतुराई दरम्यान ही फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे आणि आमचे संबंध दृढ करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.तत्पूर्वी, केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तामिळनाडूतील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंतुराई दरम्यानच्या फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला.(India- Srilanka ferry)
(हेही वाचा : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, स्वागतासाठी मुख्यमंत्री आणि इतर नेते विमानतळाकडे रवाना)
Join Our WhatsApp Community