PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवं रेकॉर्ड! ‘एक्स’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले  

164
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवं रेकॉर्ड! ‘एक्स’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले  
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नवं रेकॉर्ड! ‘एक्स’ वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनले  

सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. दिवसेंदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. रेडिओपासून आजच्या काळातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे मोठ्या संख्येत फोलोअर्स आहेत. याचाच परिपाक म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सर्वाधिक फॉलो केलेला नेता म्हणून ते समोर आलेत. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform X) त्याच्या फॉलोअर्सची संख्या 100 मिलियन म्हणजेच 10 कोटींच्या (10 million followers) पुढे गेली आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.  (PM Modi)

modi tweet 1720965361

(हेही वाचा – Mukhyamantri Tirth Darshan Yojana: भक्तांसाठी खुशखबर! ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेचा निघाला GR  )

देशातील इतर नेत्यांची तुलना केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप पुढे गेले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे X वर 26.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 27.5 मिलियन. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना X वर 19.9 दशलक्ष लोक फॉलो करतात, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे 7.4 मिलियन आणि लालू यादव यांचे 6.3 मिलियन फॉलोअर्स आहेत, तेजस्वी यादव यांचे 5.2 मिलियन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे 2.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (PM Modi)

(हेही वाचा – जीवघेणा हल्ल्यातून वाचल्याबरोबर Donald Trump यांनी आधी मानले देवाचे आभार; म्हणाले…)

केवळ देशाचेच नाही तर जागतिक नेत्यांनाही पंतप्रधान मोदी यांनी धोबीपछाड दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, दुबईचे शासक आणि पोप फ्रान्सिस यांच्यापासून पीएम मोदी खूप पुढे आहेत. बिडेन यांना केवळ 38.1 मिलियन लोक फॉलो करतात, तर दुबईचे शासक एचएच शेख मोहम्मद यांचे 11.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. पीएम मोदींची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात आणि देशात दिसून येत आहे. यामुळेच त्यांना फॉलो करणारे केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातून आहेत.

इंस्टाग्रामवर पंतप्रधान मोदींचे 91.2 मिलियन फॉलोअर्स 

मेटाच्या सोशल मीडिया (Meta social media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पीएम मोदींचे 91.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इथे पंतप्रधान कोणाला फॉलो करत नाहीत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर 806 पोस्ट केल्या आहेत. तर 13.83 दशलक्ष लोकांनी इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर पंतप्रधानांच्या चॅनेलला फॉलो केले आहे. (PM Modi)
img 20240714 wa0008 1720965792

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.