पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडिलोपार्जित (PM Modi Vadnagar) गाव वडनगर आणि त्यांची शाळा पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सरकारकडून उत्खनन केले जात आहे. या उत्खननादरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI),भौतिक संशोधन प्रयोगशाळा (PRL), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) आणि डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी 800 ईसापूर्व (2800 वर्षे) पूर्वीचे प्राचीन मानवी अवशेष शोधले आहेत.
गुजरातच्या वडनगर येथे मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. वडनगर या ठिकाणी बहु-सांस्कृतिक आणि बहु-धार्मिक (बौद्ध, हिंदू, जैन आणि इस्लामिक) वस्ती देखील आहे. या ठिकाणी अद्वितीय पुरातत्त्वीय वस्तू, मातीची भांडी, तांबे, सोने, चांदी आणि लोखंडी वस्तू आणि बारीक नक्षीकाम केलेल्या बांगड्या सापडल्या आहेत. या उत्खननाचे नेतृत्व एएसआयने केले आहे, तर गुजरात सरकारच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून या सर्वेक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp CommunityBIG NEWS – India’s oldest living city as old as 800 BCE found in PM Modi’s native village Vadnagar 🔥🔥
Characteristic archaeological artefacts, potteries, copper, gold, silver, iron objects and intricately designed bangles found ⚡
Coin moulds of the Greek king Appollodatus… pic.twitter.com/9wjYDuNk6E
— Times Algebra (@TimesAlgebraIND) January 16, 2024