पंतप्रधान मोदींनी पाहिला ‘The Sabarmati Report’; ट्वीट करून म्हणाले…

91
पंतप्रधान मोदींनी पाहिला 'The Sabarmati Report’; ट्वीट करून म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी पाहिला 'The Sabarmati Report’; ट्वीट करून म्हणाले...

गुजरातमध्ये २००२ साली घडलेल्या गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये (Sabarmati Express) घडलेल्या घटनेवर बेतलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून २२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. गोध्रा प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता विक्रांत मेसीचा ह द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट पाहिला.

(हेही वाचा – YS Jagan Mohan Reddy यांच्या अडचणी वाढणार; बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआय करणार तपास)

द साबरमती चित्रपट २ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांबरोबर पाहिला. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच चित्रपट निर्मात्याचे कौतुक केलं आहे. त्याच्या मेहनतीबाबत मोदींनी एक्सवरून पोस्ट केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक आहे, अशी पोस्ट नरेंद्र मोदींनी केली आहे.

२००२ साली गोध्रा हत्याकांडानंतर (2002 Gujarat Riots) गुजरातच्या अनेक भागात हिंसाचार उसळला होता. या घटनेत ५९ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या घटनेवर सदर चित्रपट बेतलेला असून धीरज सरना यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलता आणि जबाबदारीने हाताळला आहे. आज त्यांना योग्य श्रद्धांजली लाभली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.