World Wildlife Day: जागतिक वन्यजीव दिनानिमित्त (World Wildlife Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुजरातच्या (Gujarat) सासन येथील गीर राष्ट्रीय उद्यानात (Gir Wildlife Sanctuary) तीन दिवसीय दौऱ्यात दि. ३ मार्च रोजी सिंह सफारी केली.
( हेही वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी E-KYC अनिवार्य; ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)
गुजरातचा (Gujarat) मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi)सासनला जगातील मोठ्या पर्यटन स्थळाच्या स्वरूपात ओळख मिळवून दिली. सफारीनंतर सकाळी १० वाजता ते सासनच्या सिंह सदनमध्ये वन्य जीव बोर्डसोबत बैठक घेणार आहेत. ज्यामध्ये एकुण ४७ सभासद आहेत. यामध्ये सैन्य प्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, एनजीओ, वन सचिव आदींचा समावेश आहे. यानंतर ते दुपारी १२ वाजता सोमनाथ मंदिरात जातील. या ठिकाणी सोमनाथाचे दर्शन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे दुपारी ३ वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.(World Wildlife Day)
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आशियाई सिंहांचे एकमेव घर असलेल्या सासन गीरच्या (Gir Wildlife Sanctuary) विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. ज्यामुळे आज देश-विदेशातून लाखो पर्यटक सासर गीरमध्ये सिंह (Lion) दर्शनासाठी येतात. सध्या गुजरातच्या ९ जिल्ह्यांमध्ये ५३ तालुक्यांत जवळपास ३०,००० चौरस किलोमीटर परिसरात सिंहांचा वावर आहे. त्यात सिंहांच्या संरक्षणासाठी आणि गीरच्या समग्र विकासासाठी पंतप्रधानांनी अनेक स्तरावर प्रयत्न केले. त्यांनी स्वतः हा २००७ मध्ये गीर (Gir Wildlife Sanctuary) वनक्षेत्राचा दौरा केला होता आणि तेथील परिस्थितीचा माहिती घेतली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community