सोनिया गांधींनी नेहरूंची कागदपत्रे परत नेल्याचा परिणाम; आता PM Museum गोपनीयतेच्या अटींसह कागदपत्रे स्वीकारणार नाही

PM Museum : यापुढे कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींची खाजगी कागदपत्रे पीएम म्युझियममध्ये जमा करायची असतील, तर ती कागदपत्रे अनिश्चित काळासाठी गोपनीय ठेवण्याची अट स्वीकारण्यात येणार नाही.

178
सोनिया गांधींनी नेहरूंची कागदपत्रे परत नेल्याचा परिणाम; आता PM Museum गोपनीयतेच्या अटींसह कागदपत्रे स्वीकारणार नाही
सोनिया गांधींनी नेहरूंची कागदपत्रे परत नेल्याचा परिणाम; आता PM Museum गोपनीयतेच्या अटींसह कागदपत्रे स्वीकारणार नाही

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी 2008 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) खाजगी संग्रहातील (गांधी कुटुंबाने दान केलेल्या) कागदपत्रांच्या पेट्या PM Museum या राष्ट्रीय संग्रहालयातून काढून घेतल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाने (पीएमएमएल) यांनी निर्णय घेतला आहे की, यापुढे कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तींची खाजगी कागदपत्रे पीएम म्युझियममध्ये जमा करायची असतील, तर ती कागदपत्रे अनिश्चित काळासाठी गोपनीय ठेवण्याची अट स्वीकारण्यात येणार नाही.

(हेही वाचा – Vasai Murder Case: पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी केली याचना; म्हणाली “मुझे मेरी बेटी की जान…”)

यापुढे PMML देणगीदारांकडून कागदपत्रांचा कोणताही नवीन संच स्वीकारण्यापूर्वी अधिकाधिक ५ वर्षे गोपनीयता बाळगण्याला मान्यता देईल. काही प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत गोपनीयता बाळगली जाऊ शकते.

लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी.डी. मावळकर, नेहरूंची भाची नयनतारा सहगल (Nayantara Sehgal) आणि 2008 मध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी दावा न केलेल्या नेहरूंशी संबंधित 2 लाख 80 हजार पानांच्या खासगी संग्रहाचे संच उघडण्याचा निर्णयही पीएमएमएलने घेतला आहे. नेहरूंच्या कागदपत्रांचे सध्या डिजिटायझेशन केले जात आहे. संपूर्ण संच दोन महिन्यांत संशोधकांना ऑनलाइन उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल, PMML) पूर्वी नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल, NMML) हे देशातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. या संग्रहालयात १००० हून अधिक महत्त्वपूर्ण नेते आणि मान्यवर यांचे दस्तावेज संग्रहित करण्यात आले आहेत. या संग्रहालयात असलेल्या पंतप्रधान नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) कागदपत्रांपैकी ५१ पेट्या भरून कागदपत्रे सोनिया गांधी यांनी काढून घेतली आहेत. ही कागदपत्रे १९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीच संग्रहालयाला दान केली होती. आता सरकार ही कागदपत्रे परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी कायदेशीर चाचपणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.