भारताने ९ वर्षे आधीच ‘हे’ उद्दिष्ट केले पूर्ण; PM Modi यांनी हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

102
भारताने ९ वर्षे आधीच 'हे' उद्दिष्ट केले पूर्ण; PM Modi यांनी हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

जगभरात महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे. हवामान बदल ही केवळ भविष्याची बाब नसून त्याचा प्रभाव आता जाणवू शकतो ही जाणीव आज वाढताना दिसत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. हरित हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले की, हवामान बदलाच्या संदर्भात आता आणि हीच कृती करण्याची वेळ आहे. ऊर्जा संक्रमण आणि शाश्वतता जागतिक धोरणात्मक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. स्वच्छ आणि हरित ग्रह निर्माण करण्याप्रति देशाची बांधिलकी अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, हरित ऊर्जेवरील पॅरिस करारातील वचनबद्धतेची पूर्तता करणाऱ्या पहिल्या जी २० राष्ट्रांपैकी भारत एक होता. या वचनबद्धतेची पूर्तता २०३० च्या उद्दिष्टाच्या ९ वर्षे आधीच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांतील प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भारताची स्थापित बिगर – जीवाश्म इंधन क्षमता सुमारे ३०० टक्के वाढली आहे तर सौर ऊर्जा क्षमता ३,००० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. मोदी यांनी अधोरेखित केले की आम्ही केवळ या कामगिरींवर समाधान मानत नाही. सध्याच्या उपायांना बळकट करण्यावर देश लक्ष केंद्रित करत आहे त्याचबरोबर नवीन आणि अभिनव क्षेत्रांचा देखील शोध घेत असून हरित हायड्रोजन हे त्यापैकीच एक आहे.

(हेही वाचा – लेस्टर (इंग्लंड) येथे हिंदूविरोधी दंगल भडकवणारा Majid Freeman याला कारावास)

पंतप्रधानांनी ‘या’ गोष्टींचा केला ठळकपणे उल्लेख 

“जागतिक ऊर्जा पटलावर हरित हायड्रोजन एक आशेचा किरण म्हणून उदयाला येत आहे”, असे पंतप्रधान (PM Narendra Modi) म्हणाले. विद्युतीकरण करणे कठीण असलेल्या उद्योगांचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात ते मदत करू शकते असे सांगत त्यांनी तेल शुद्धीकरण प्रकल्प, खते, पोलाद, अवजड माल – वाहतूक आणि इतर अनेक क्षेत्रांची उदाहरणे त्यांनी दिली ज्यांना याचा फायदा होईल. हरित हायड्रोजनचा वापर अतिरिक्त नवीकरणीय ऊर्जेसाठी साठवण उपाय म्हणून केला जाऊ शकतो अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

२०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाबाबत बोलताना पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) भारताला हरित हायड्रोजनचे उत्पादन, वापर आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टांची रूपरेषा सांगितली. “राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान नवोन्मेष, पायाभूत सुविधा, उद्योग आणि गुंतवणूकीला चालना देत आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अत्याधुनिक संशोधन आणि विकासामधील गुंतवणूक, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागीदारी आणि या क्षेत्रातील स्टार्ट-अप्स आणि उद्योजकांसाठी प्रोत्साहन यांचाही त्यांनी ठळक उल्लेख केला. हरित रोजगार निर्मिती व्यवस्थेच्या विकासासाठी यात अफाट क्षमता असल्याचे नमूद करत या क्षेत्रात देशातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी सरकार करत असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.