केंद्रीय शिक्षण मंडळाची १२वीचीही परीक्षा रद्द! 

बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरच जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा आमचे पहिले प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अवघ्या शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. कधी नव्हे ते बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्णय शिक्षण घ्यावे लागत आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाने १० वीच्या पाठोपाठ १२वीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयालाही कळवण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री आजारी पडल्यावर मोदींनी घेतले नियंत्रण!

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला यासंबंधी २ दिवसांत निर्णय घेऊ असे कळवले होते. त्याप्रमाणे केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरियाल निशंकहे बैठक घेणार होते, मात्र त्यांना अचानक शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांना आंस रुग्णालयात दाखल केले. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व यंत्रणा हातात घेऊन बैठक घेतली आणि अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्राने हा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर उच्च न्यायालयातील १०वीचा निर्णय अवलंबून! )

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचे जाहीर केले. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरच जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा आमचे पहिले प्राधान्य आहे, असे मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळे दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असेही मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका

देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अ‌ॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता. त्यापूर्वीच मोदी सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here