पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे आपण आजवर अनेकदा पाहिले आहे. गुरुवारी एका अंध वडिलांच्या मुलीचे भावनिक उद्गार ऐकून मोदी पुन्हा एकदा गहिवरले आणि उपस्थितांनाही आपले अश्रू अनावर झाले.
विविध सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या गुजरात मधील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी असंख्य लाभार्थी भरुच येथे जमले होते. यावेळी एका अंध वडिलांच्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून मोदींचा कंठ दाटून आला आणि ते बोलताना मध्येच थांबले.
मुलीला रडू कोसळले
चुकीच्या औषधोपचारांमुळे दृष्टी गमावलेल्या आयूब पटेल यांच्याशी संवाद साधताना मोदींनी त्यांच्याकडे आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. तेव्हा आपल्या मुलीचे डॉक्टर व्हायचे स्वप्न असल्याचे आयूब यांनी सांगितले. आयूब यांचे विधान ऐकून मोदींनी त्यांच्या मुलीला तुला डॉक्टर का व्हायचंय असा प्रश्न विचारला. तेव्हा माझ्या वडिलांना असणारा दृष्टीचा आजार बरा करण्यासाठी मला डॉक्टर व्हायचे असल्याचे मुलीने सांगितले आणि तिला रडू कोसळले.
#WATCH | While talking to Ayub Patel, one of the beneficiaries of govt schemes in Gujarat during an event, PM Modi gets emotional after hearing about his daughter's dream of becoming a doctor & said, "Let me know if you need any help to fulfill the dream of your daughters" pic.twitter.com/YuuVpcXPiy
— ANI (@ANI) May 12, 2022
मोदी गहिवरले
तिचे ते उत्तर आणि अश्रू पाहून पंतप्रधान मोदी यांनाही गहिवरुन आले. बोलताना अचानक त्यांचा कंठ दाटून आला. ते काही क्षण तसेच शांत बसून राहिले. उपस्थितांनाही मोदींच्या भावना लक्षात आल्या आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सावरल्यानंतर मोदी यांनी त्या मुलीचे तोंडभरुन कौतुक केले आणि तुझी हीच इच्छाशक्ती तुझी खरी ताकद असल्याचे मोदी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community