PM Narendra Modi यांनी पुण्यातील मेट्रो मार्गाचे केले ऑनलाईन उद्घाटन

पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या 1,810 कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पाचा आहे.

130

बहुप्रतिक्षेत आणि बहिचर्चित पुणे मेट्रोच्या भूमिगत विभागाचे उदघाटन रविवार, २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आले. महाराष्ट्रात 11,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच महाराष्ट्रातील सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन केले.

पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या 1,810 कोटी रुपये इतका खर्च या प्रकल्पाचा आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) हे 26 सप्टेंबर रोजी या प्रकल्पांचे अनावरण आणि लोकार्पण करणार होते. मात्र पुणे आणि परिसरात पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला होता. मेट्रो भूमिगत प्रकल्पाचे उदघाटन केल्यानंतर अंदाजे 2,955 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. हा 5.46 किमी लांबीचा दक्षिणेकडील विस्तार पूर्णपणे भूमिगत असेल आणि त्यात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके असतील.

(हेही वाचा Hassan Nasrallah ठार झाल्यानंतर Jammu & Kashmir मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; होत आहे आतंकवादाचे समर्थन)

पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) बिडकीन औद्योगिक क्षेत्रही राष्ट्राला समर्पित केले. नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत 7,855 एकरमध्ये पसरलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प आहे. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित झालेल्या या प्रकल्पात मराठवाडा विभागातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून प्रचंड क्षमता आहे. केंद्र सरकारने तीन टप्प्यांत विकासासाठी एकूण 6,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.