PM Narendra Modi : विपश्यना अधिक स्वीकार्य बनवण्यासाठी भारताने पुढाकार घेण्याची गरज

विपश्यना ध्यानसाधनेचे गुरु, आचार्य एस एन गोयंका यांच्या वर्षभरापूर्वी जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्राने ‘अमृत महोत्सव’ साजरा केला आणि त्याच वेळी कल्याण मित्र गोयंका यांच्या आदर्शांचेही स्मरण केले.

267
आयटीबीपी दल शौर्य आणि समर्पणाचे प्रतिक - PM Narendra Modi

विपश्यना हा एक आत्मिक प्रवास आहे आणि आत्मचिंतनाचा मार्ग आहे. तथापि, ही केवळ एक शैली नसून एक विज्ञान आहे. या विज्ञानाच्या परिणामांची आपल्याला माहिती असल्याने आता आधुनिक विज्ञानाच्या मानकांनुसार त्याचे पुरावे जगासमोर मांडण्याची गरज आहे. जगाचे कल्याण करण्यासाठी नवीन संशोधनाचा वापर करून ते अधिक स्वीकारार्ह बनवण्यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एस एन गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चाललेल्या सोहळ्याच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी रविवार ४ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

(हेही वाचा – Mufti Salman Azhari : मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला रातोरात गुजरातमध्ये हलवले; घाटकोपरमध्ये तणावपूर्व शांतता)

एकत्र ध्यान केल्याने त्याचे प्रभावकारक परिणाम मिळतात – पंतप्रधान

विपश्यना ध्यानसाधनेचे गुरु, आचार्य एस एन गोयंका यांच्या वर्षभरापूर्वी जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) अधोरेखित केले की राष्ट्राने ‘अमृत महोत्सव’ साजरा केला आणि त्याच वेळी कल्याण मित्र गोयंका यांच्या आदर्शांचेही स्मरण केले. आज जेव्हा या उत्सवांची सांगता होत आहे, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोयंका गुरुजी अनेकदा उद्धृत करत असलेल्या भगवान बुद्धांच्या मंत्राचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि ते म्हणाले, “एकत्र ध्यान केल्याने त्याचे प्रभावकारक परिणाम मिळतात. ही एकात्मतेची भावना आणि एकतेची शक्ती हाच विकसित भारताचा मुख्य आधार आहे. वर्षभर याच मंत्राचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा – Kunal Raut Congress : पंतप्रधान मोदींच्या पोस्टरवर काळं फासणं पडलं महागात ; कुणाल राऊत यांना अटक)

“एक जीवन, एक उद्देश” चे उत्तम उदाहरण म्हणजे गोयंका – पंतप्रधान मोदी 

पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) गोयंका यांच्याशी असलेल्या स्नेहबंधाची आठवण करत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक धर्म परिषदेतील पहिल्या बैठकीनंतर गोयंका गुरुजींची गुजरातमध्ये अनेक वेळा भेट झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आचार्यांना त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात पाहता आल्याबद्दल आणि त्या काळात आचार्यांना जवळून जाणून आणि समजून घ्यायला मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी स्वतःला भाग्यवान म्हणवले. गोयंका यांनी त्यांच्या शांत आणि गंभीर व्यक्तिमत्त्वात विपश्यना खोलवर आत्मसात केल्याबद्दल पंतप्रधानांनी भाष्य केले. यामुळेच गोयंका जिथेही गेले तिथे सात्विक वातावरण निर्माण झाले, असे पंतप्रधानांनी सांगितले. “एक जीवन, एक उद्देश’ चे उत्तम उदाहरण म्हणजे गोयंका यांचे जीवन. गोयंका यांचे एकच मिशन होते – विपश्यना! त्यांनी प्रत्येकाला विपश्यनेचे ज्ञान दिले”,असे पंतप्रधान म्हणाले. गोयंका यांनी मानवता आणि जगासाठी दिलेल्या प्रचंड योगदानाची पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) प्रशंसा केली.

(हेही वाचा – अद्भुत कलाकार, आधुनिक शिल्पकार Amarnath Sehgal)

विपश्यना म्हणजे “स्व-निरीक्षणाद्वारे आत्म-परिवर्तनाचा मार्ग –

म्यानमारमध्ये १४ वर्षांच्या तपश्चर्येनंतर गोएंका यांनी ज्ञान संपादन केले आणि भारताच्या विपश्यनेचे प्राचीन वैभव घेऊन ते मायदेशी परतले, असे पंतप्रधानांनी सांगितले. विपश्यनेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की विपश्यना म्हणजे “स्व-निरीक्षणाद्वारे आत्म-परिवर्तनाचा मार्ग आहे.” हजारो वर्षांपूर्वी जेव्हा विपश्यनेच्या साधनेची सुरुवात झाली तेव्हाही ती महत्वाची होती आणि विपश्यनेमध्ये वर्तमान आव्हानांचे निराकरण करण्याची शक्ती असून आजच्या आधुनिक काळात विपश्यना अधिक प्रासंगिक ठरत असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, गुरुजींच्या प्रयत्नांमुळे जगातील 80 हून अधिक देशांनी ध्यान साधनेचे महत्त्व समजून घेतले आहे आणि ते आत्मसात केले आहे. “आचार्य श्री गोयंका यांनी पुन्हा एकदा विपश्यनेला जागतिक ओळख प्राप्त करून दिली. आज भारत त्या संकल्पना पूर्ण ताकदीनिशी नव्याने विस्तारत चालला आहे”, असे नमूद करत (PM Narendra Modi) पंतप्रधानांनी, संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला 190 हून अधिक देशांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली, ज्यामुळे योग आज जागतिक स्तरावर जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

(हेही वाचा – ASI : मथुरेत कृष्ण मंदिर पाडून औरंगजेबाने बांधली मशीद; भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची माहिती)

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) आचार्य एसएन गोयंका यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे हे वर्ष सर्वांसाठी एक प्रेरणादायी काळ असल्याचे म्हटले आणि मानवसेवेसाठी त्यांचे प्रयत्न असेच पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.