पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ऑटोमोबाईल राष्ट्रीय स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली. या नव्या धोरणामुळे जुन्या गाड्या स्क्रॅप करणा-यांना चांगला फायदा होणार आहे. जुन्या गाड्या स्कॅप करणा-या ग्राहकाला नव्या गाडीसाठी कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही, असे या धोरणात म्हटले आहे. यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
काय म्हणाले मोदी?
आत्मनिर्भर भारत मोहिमेला गती देण्यासाठी देशात उद्योगांना शाश्वत आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी वाहन निर्मितीसाठी लागणा-या वस्तूंची कमीत-कमी आयात करण्यावर आपण भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीच हे नवे वाहन धोरण उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः शिवशाहिरांनी पंतप्रधानांकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त!)
कसा होणार लाभ?
- या नव्या धोरणामुळे सर्वसामांन्यांना चांगला लाभ मिळणार आहे. जुन्या गाड्या स्कॅप करणा-या व्यक्तीला एक प्रमाणपत्र देण्यात येईल.
- हे प्रमाणपत्र ज्या व्यक्तीकडे असेल, त्या व्यक्तीला नवी गाडी खरेदी करताना भरावे लागणारे नोंदणी शुल्क(रजिस्ट्रेशन फी) माफ केले जाणार आहे.
- त्यासोबतच त्या व्यक्तीला रोड टॅक्समध्येही सूट देण्यात येणार आहे.
- जुन्या गाडीच्या दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा जास्त असतो. या स्क्रॅप धोरणामुळे नागरिकांचा तो खर्चही वाचणार आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुन्या वाहनांमध्ये असलेल्या जुन्या तंत्रज्ञानामुळे अपघातांचा धोकाही जास्त असतो, हा धोका कमी होण्यास या धोरणामुळे नक्कीच मदत होईल.
- जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी होण्यास मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
इस पॉलिसी से सामान्य परिवारों को हर प्रकार से बहुत लाभ होगा।
सबसे पहला लाभ ये होगा कि पुरानी गाड़ी को स्क्रैप करने पर एक सर्टिफिकेट मिलेगा।
ये सर्टिफिकेट जिसके पास होगा उसे नई गाड़ी की खरीद पर रजिस्ट्रेशन के लिए कोई पैसा नहीं देना होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 13, 2021
Join Our WhatsApp Communityतीसरा लाभ सीधा जीवन से जुड़ा है।
पुरानी गाड़ियों, पुरानी टेक्नॉलॉजी के कारण रोड एक्सीडेंट का खतरा बहुत अधिक रहता है, जिससे मुक्ति मिलेगी।
चौथा, इससे हमारे स्वास्थ्य प्रदूषण के कारण जो असर पड़ता है, उसमें कमी आएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 13, 2021