PM Narendra Modi मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर; युद्धनौकांचे लोकार्पण, मंदिराचे उद्घाटन, आमदारांशी साधणार संवाद

42
PM Narendra Modi मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर; युद्धनौकांचे लोकार्पण, मंदिराचे उद्घाटन, आमदारांशी साधणार संवाद
PM Narendra Modi मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर; युद्धनौकांचे लोकार्पण, मंदिराचे उद्घाटन, आमदारांशी साधणार संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बुधवार, १५ जानेवारी या दिवशी मुंबई आणि नवी मुंबईत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’ (INS Surat), ‘आयएनएस निलगिरी’ (INS Nilgiri) या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ (INS Waghsheer) या पाणबुडीचे सकाळी साडेदहा वाजता जलावतरण होईल. त्यानंतर ते महायुतीच्या आमदारांशी बैठकीत संवाद साधणार आहेत. तसेच ते खारघर येथे ‘इस्कॉन’ (iskcon) मंदिराचे उद्घाटनही करणार आहेत.

(हेही वाचा – CISF च्या 2 नवीन बटालियन्सना गृह मंत्रालयांची मान्यता, हजारो तरुणांना मिळणार नोकऱ्या)

दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. ही क्षेपणास्त्रवाहू (पी१५बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे.

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मोदी (PM Narendra Modi) मुंबईत येत आहेत. त्यांच्या बैठकीसाठी आमदारांना सभागृहात मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आमदारांना विधानभवन परिसरात एकत्र जमण्यास सांगण्यात आले आहे. तेथून बसमधून आमदारांना बैठकीच्या स्थळी नेण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.