तत्कालीन केंद्र सरकारने गोध्रा हत्याकांडात नाहक अडकवले; लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi म्हणाले…

30
तत्कालीन केंद्र सरकारने गोध्रा हत्याकांडात नाहक अडकवले; लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi म्हणाले...
तत्कालीन केंद्र सरकारने गोध्रा हत्याकांडात नाहक अडकवले; लेक्स फ्रिडमनच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमनला (Lex Fridman Podcast) दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) गोध्रा हत्याकांडाची घटना ही अकल्पनीय शोकांतिका असल्याचे मत व्यक्त केले. तसेच वेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे ही मोदी यांनी सांगितले.

( हेही वाचा : Anand Foundation च्या संकल्पनेतून रंगला ‘आनंद जागर- उत्सव लोककलांचा’

दरम्यान पाकिस्तानसोबतच्या (Pakistan) भारताच्या तणावपूर्ण संबंधांबद्दल भाष्य करताना मोदी म्हणाले, पाकिस्तान (Pakistan) दहशतवादाला (Terrorism) प्रोत्साहन देत असून शांततेचे प्रयत्न हाणून पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. दि. १६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संबंध, मुत्सद्देगिरीचे भूतकाळातील प्रयत्न आणि द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याबद्दलही केली.

२००२ च्या दंगलीबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणे महत्त्वाचं आहे. २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू ते दिल्लीला जाणारे विमान अपहरण करून कंदहारला नेण्यात आले. २००० मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला होता. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी (Terrorism) हल्ला झाला होता. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता, असे मोदी म्हणाले. हे जागतिक स्तरावरील दहशतवादी हल्ले होते, ज्याने जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ७ ऑक्टोबर २००१ रोजी मी गुजरातचा मुख्यमंत्री होणार होतो. २४ फेब्रुवारी २००२ ला मी पहिल्यांदा आमदार झालो. माझे सरकार २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार होते, तेव्हा आम्हाला गोध्रा रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाली. ही अत्यंत गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. आधीच्या सगळ्या घटनांनंतर परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करु शकता. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक मोठ्या दंगली झाल्या, असा आरोपही त्यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर केला. तसेच २००२ नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींनी १९४७ च्या फाळणीचा उल्लेख केला

लेक्स फ्रिडमन यांनी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणावपूर्ण संघर्षाबद्दल प्रश्न विचारला. त्याने विचारले की त्याला मैत्री आणि शांतीचा काही मार्ग दिसतो का? यावर पंतप्रधान मोदींनी १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीची आठवण करून दिली आणि तो इतिहासातील एक वेदनादायक आणि रक्तरंजित अध्याय असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, फाळणी स्वीकारूनही पाकिस्तानने शांततापूर्ण सहअस्तित्वाचा मार्ग निवडला नाही.

‘जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाला तरी त्याची खूण…’

पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर दहशतवाद (Terrorism) पसरवण्याचा आरोप केला आहे. तसेच भारत हा एकमेव बळी नाही, तर पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी कारवायांचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) म्हणाले की, ‘जगात कुठेही दहशतवादी हल्ला होतो, त्याचा माग पाकिस्तानकडे जातो.’ उदाहरणार्थ, ११ सप्टेंबरचा हल्ला घ्या. यामागील सूत्रधार ओसामा बिन लादेन शेवटी कुठून आला? त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला होता. (PM Narendra Modi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.