पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१८ जानेवारी ) श्री राम जन्मभूमी मंदिरावरील स्मारक टपाल तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच भगवान रामावर आधारीत जगभरात जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या पुस्तकाचे अनावरण केले. (PM Narendra Modi)
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर केलेल्या व्हिडिओ मध्ये ते म्हणाले की, आज मला श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा अभियानाने आयोजित केलेल्या आणखी एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री राम जन्मभूमी मंदिरावरील सहा स्मारक टपाल तिकिटे आणि भगवान रामावर जगभरात जारी केलेल्या टपाल तिकिटांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. तर त्यांनी पुढे म्हटले की, मला देशातील जनतेचे आणि जगभरातील सर्व राम भक्तांचे अभिनंदन करायचे आहे. (PM Narendra Modi)
#WATCH | Prime Minister Narendra Modi says “Today, I got the opportunity to join another event organised by Shri Ram Mandir Pran Pratishtha Abhiyan. Today, 6 Commemorative Postage Stamps on Shri Ram Janmbhoomi Mandir and an album of stamps issued on Lord Ram around the world have… https://t.co/cgSOT6MGZy pic.twitter.com/QmdB0PrGrL
— ANI (@ANI) January 18, 2024
(हेही वाचा : Hema Malini : आता मथुरेचा नंबर; मथुरेतही कृष्णाचे भव्य मंदिर बनले पाहिजे)
काय आहे टपाल तिकिटावर
या टपाल तिकिटावर श्रीराम मंदिर ‘मंगल भवन अमंगल हारी’ ही ओळ सूर्य, शरयू नदी आणि मंदिरातील आणि सभोवतालच्या शिल्पांचा समावेश आहे. तसेच इतर तिकिटांवर राम मंदिर, भगवान गणेश, भगवान हनुमान, जटायु, केवत्राज आणि माँ शबरी असे एकूण सहा टपाल तिकिटे आहेत. या तिकिटांच्या डिझाइनमधून ‘पंचभूत’ म्हणून ओळखले जाणारे आकाश, हवा, अग्नी, पृथ्वी आणि पाणी हे दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community